फळयेफोंडे येथे ३ व ४ एप्रिल रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

फळयेफोंडे येथे ३ व ४ एप्रिल रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

वेंगुर्ला.

   फळयेफोंडेवाडी येथील श्री ब्राम्हण देव ग्रामस्थ मित्र मंडळ,फळयेफोंडेवाडी यांच्यावतीने बुधवार ३ व गुरुवार ४ एप्रिल रोजी वार्षिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    श्री साई गणेश मित्र मंडळ फळयेफोंडे रंगमंच, फळयेफोंडे शाळेजवळ होणाऱ्या या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात बुधवार ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद,सायंकाळी ७ वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा नाट्यप्रयोग तर गुरुवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ब्राम्हण देव ग्रामस्थ मित्र मंडळ फळयेफोंडेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.