कणकवली नगर वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.
कणकवली.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून रविवारी येथील नगरवाचनालयात महापुरुषांच्या जीवनावर आधारित असलेल्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन केले. दरम्यान, यावेळी कलाम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन वाचनालयात भरविण्यात आले होते.याला वाचक प्रेमींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, वैयजंती करंदीकर, विद्यामंदिर प्रशालेच्या शिक्षिका विद्या शिरसाट, स्नेहा सावंत, ग्रंथालयाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ.कलाम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या अग्निपंख पुस्तकाचे वाचन सारा गोखले, देवमाणूस पुस्तकाचे वाचन कर्तृत्वा हरकुळकर, श्यामची आई पुस्तकाचे वाचन मृण्यमी कामतेकर, मृत्यू पाहिलेली माणसे या पुस्तकाचे वाचन अनन्या जाधव, आनंद गोपाळ या पुस्तकाचे वाचन शरयू पोतदार यांनी केले.