देवगड मध्ये श्री महादेव, श्री महाकाली व श्री महालक्ष्मी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आजपासून.

देवगड मध्ये श्री महादेव, श्री महाकाली व श्री महालक्ष्मी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आजपासून.

देवगड. 

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात फणसगाव व विठ्ठलादेवी गावातील श्री देव महादेव, श्री देवी महालक्ष्मी व श्री देवी महाकालीच्या जीर्णोद्धार मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा १७ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री देवी महालक्ष्मी, श्री देवी महाकाली व श्री देव महादेव सेवा मंडळ मुंबई-ग्रामीण उत्सव समितीचे अध्यक्ष अनुरुद्र विठ्ठल नारकर यांनी केले आहे.

   १७ रोजी श्री देव महादेव जीर्णोद्धार मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सकाळी ७.३० वा. धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. आरती. १८ रोजी सकाळी ७.३० वा. धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ वा. आरती व पालखीतून मिरवणूक, रात्री ९ वा. स्थानिक भजने. १९ रोजी स्थापित देवतांची पूजा, अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ वा. आरती व पालखीतून मिरवणूक, रात्री ९ वा  स्थानिक भजने. दि. २१ रोजी श्री देवी महालक्ष्मीच्या जीर्णोद्धार मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सकाळी ७.३० वा. धार्मिक विधी, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ आरती. २२ रोजी सकाळी ७.३० वा. धार्मिक विधी व कोल्हापूर येथील करवीर पिठाचे श्री जगत्गुरु स्वामी शंकराचार्य यांच्या हस्ते कलशारोहण, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ९ दीपोत्सव, आरती व पालखी मिरवणूक, रात्री ९ वा. ब्राह्मणदेव महिला मंडळाचे समईनृत्य. २३ रोजी सकाळी ७.३० वा. विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ आरती व पालखी मिरवणूक, रात्री ९ वा. देवगड- नाडण येथील श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप पुजारे विरुद्ध कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे बुवा विजय उर्फ गुंडू सावंत यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.