भाजपा वेंगुर्ला च्या वतीने ' मेरी मीट्टी - मेरा देश ' अभियान अंतर्गत हुतात्मा स्मारकाला पुष्षचक्र अर्पण करून अभिवादन.

भाजपा वेंगुर्ला च्या वतीने ' मेरी मीट्टी - मेरा देश ' अभियान अंतर्गत हुतात्मा स्मारकाला पुष्षचक्र अर्पण करून अभिवादन.

वेंगुर्ला.

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत " मेरी मिट्टी मेरा देश " या अभियान अंतर्गत भाजपा तालुका कार्यालयावर तिरंगा फडकवुन, ग्रामीण रुग्णालया समोरील स्मारकाला पुष्षचक्र अर्पण करून  पंचप्रण शपथ घेण्यात आली.
   देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ " मेरी मिट्टी - मेरा देश " अभियान देशभरात सर्वत्र राबविले जात आहे . स्वातंत्र्याच्या अमृत मोहस्तव सांगता सोहळ्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पंचप्रण दिले आहेत. या पंचप्रणाच्या माध्यमातून आपण सर्वानी २०४७ सालापर्यंत विकसित भारत निर्माण करण्याची शपथ घेतली आहे. सर्व पंचप्रणाच्या माध्यमातून आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले.
  यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी महीला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका साक्षी पेडणेकर व श्रेया मयेकर, किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु, ता.चिटणीस जयंत मोंडकर, माजी उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस, युवा मोर्चाचे भुषण आंगचेकर व भुषण सारंग, बुथ अध्यक्ष शेखर काणेकर - नितिश कुडतरकर - पुंडलिक हळदणकर - सुधिर पालयेकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ.पवार, परिचारीका तांडेल, सुनील मठकर व रसिका मठकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री इत्यादी उपस्थित होते .