कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र.

कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र.

कणकवली.

    तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गुरुनाथ भाऊ आचरेकर यांनी आज उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला. यामुळे नांदगाव विभागात असलेल्या कोळोशी मध्ये उबाठा सेनेला खिंडार पाडले आहे.आमदार नितेश राणेंच्या उपस्थित सलग सातव्या दिवशी ही भाजपा मधे इनकमिंग सुरू असल्याने भाजपा मधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष गोट्या सावंत,तालुका अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी सरपंच सुशिल इंदप, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, छोटू खोत, आयनल माजी सरपंच बापू फाटक, कमलाकर पाटील, ग्रा.प.सदस्य सुचित्रा पोकळे, शैलेंद्र इंदप, चंदू शिंदे, आनंद शेलार, चंद्रकांत इंदप, छोटू खोत, मंगेश इंदप आदी उपस्थित होते.