सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मकरंद देशमुख यांनी स्वीकारला पदभार.
सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मकरंद देशमुख यांनी आज पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे. सेवेच्या यापूर्वीच्या काळात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या पदावर सुद्धा चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची गोंदिया जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागी मंत्रालयात सचिवालयात अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या मकरंद देशमुख यांची शासनाने नियुक्ती केली होती. त्यानंतर नायर यांनी आपला पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांच्याकडे दिला होता. आज देशमुख यांनी हजर होत हा कार्यभार स्वीकारला आहे.
मकरंद देशमुख हे यापूर्वी २००४ ते २००६ या कालावधीत कणकवली प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी प्रांताधिकारी म्हणून चांगले काम केले होते.