सावंतवाडी येथे २९ सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचे आयोजन.

सावंतवाडी येथे २९ सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

   जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, सावंतवाडी येथील मल्टी पर्पज हॉल येथे" शौर्य दिन"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
   जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरनारी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी, यांनी "शौर्य दिन" साजरा करण्यासाठी सावंतवाडी येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२३६२ २२८८२०, ९३२२०५१२८४ वर  संपर्क करावा.