नवाबाग घुमटेश्र्वर मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
वेंगुर्ला.
नवाबाग ग्रामस्थांच्या वतीने दिनांक १३ व १४ फेब्रुवारी रोजी वर्ष ७ वे ‘नवाबागचा राजा’ माघी गणेश जयंती उत्सवाचे
बायुला घुमटेश्र्वर मंदिर नवाबाग येथे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या निमित्ताने मंगळवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. श्री गणरायाचे जल्लोषात आगमन मिरवणूक सोहळा, सकाळी ९.०० वा. श्री गणपती पूजन दुपारी १२.०० वा. आरती व तीर्थप्रसाद संध्याकाळ. दुपारी ४.०० वा. लहान मुलांसाठी मजेदार खेळ, सायं. ५.३० वा. संगीत आरती (नवावान ग्रामस्थ), संध्याकाळी ६.३० वा.श्री देव सिद्धेश्वर भजन मंडळ, कोंडुरा, रात्री ८.०० वा लकी ड्रॉ कुपन स्पर्धा, रात्री ९.३० वैभवी क्रिएशन डिचोली (गोवा) निर्मित आणि फाळकर प्रस्तुत ‘अग्गंबाई सुनबाई’.
बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ५.०० वा. काकड आरती, सकाळी ७.०० वा. श्री गणपती पुजन व आरती, सकाळी ९.०० वा. वारकरी भजन नवाबाग ग्रामस्थ, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. स्थानिक महिलांची फुगडी व हळदी कुंकू समारंभ, संध्याकाळी ६.०० वा.विसर्जन सोहळा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नवाबाग ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.