दोन विमानांचे लॅंडिंग आणि टेकऑफ एकाच धावपट्टीवरुन एकाच वेळी. सुदैवाने दोन विमानांची धडक टळली.

दोन विमानांचे लॅंडिंग आणि टेकऑफ एकाच धावपट्टीवरुन एकाच वेळी.  सुदैवाने दोन विमानांची धडक टळली.

मुंबई.

  मुंबई विमानतळावर विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफचा थरार घडल्याचा व्हिडीओ समोर आला. ज्यात एकाच धावपट्टीवरून एअर इंडिया(Air India)चे विमान 320 टेक ऑफ करताना इंडिगो(IndiGo)चे 6E 6053 विमान धोकादायक लँडिंग करताना दिसले. इंडिगोच्या पायलटने घेतलेल्या या रिस्की लँडिंगमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.व्हिडिओमध्ये, एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून निघाल्यानंतर काही मिनिटात इंडिगोचे विमान खाली उतरताना दिसले. दरम्यान, ही घटना मुंबई विमानतळाच्या ATC कडून विमानाच्या लँडिंग दरम्यान मिळालेल्या चुकीच्या क्लिअरन्समुळे घडली.ज्यात कारवाई करत डीजीसीएकडून दोषी एटीसी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,8 जून रोजी मुंबई विमानतळावर घडली.ज्यात एअर इंडियाचे विमान टेक ऑफच्या तयारीत असताना इंडिगोच्या विमानाने मिळालेल्या चुकीच्या क्लिअरन्समुळे रनवे 27 वर लँडिंग केले होते.दरम्यान, या घटनेत पायलटच्या तप्तरतेमुळे अनेकांचा जीव बचावला.अन्यथा मोठी दुर्घटना ही अटळ होती.