भारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय. विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक झळकावले.

भारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय.  विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक झळकावले.

पुणे.

  पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत बांगलादेश सामन्यात प्रथम फलंदाजी - करणाऱ्या बांगलादेशला २५६ धावांपर्यंतच मजल मारता आली. लिटन दास (६६)आणि तन्जिद हसन (५१) यांनी ९३ धावांची सलामी दिली.भारताने बांगलादेशचे २५७ धावांचा आव्हान ४२ व्या षटकात पार करत वर्ल्डकपमधील आपला विजयी चौकार लगावला. भारताकडून विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक ठोकले. त्याने ९७ चेंडूत १०३ धावा केल्या. त्याने आपले शतक षटकार मारत पूर्ण केले. शुभमन गिलने ५३ धावा केल्या तर रोहितने ४८ धावा करत धडाकेबाज सुरूवात करून दिली..मात्र त्यानंतर बांगलादेशचा डाव डगमगला. स्लॉग ओव्हरमध्ये महोम्मदुल्ला आणि मुशफिकूर रहीम यांनी थोडा प्रतिकार केला त्यामुळे बांगलादेशला २५० धावांच्या जवळ पोहचता आले. भारताकडून मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.