माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडा यांचा पुत्र एच.डी.रेवन्ना यांना एसआयटी कडून अटक.

माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडा यांचा पुत्र एच.डी.रेवन्ना यांना एसआयटी कडून अटक.

कर्नाटक.

  माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना  यांना कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने अटक केली आहे. अपहरण प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे.गेल्या गुरुवारी म्हैसूरमधील एका महिलेने एचडी रेवन्ना यांच्याविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार एसआयटीने रेवन्ना यांना दोन वेळा नोटीस बजावली होती मात्र त्यानंतरही ते पोलिसात हजर झाले नाहीत. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेपासून वाचण्यासाठी एचडी रेवन्ना यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आज रोजी सुनावणी होणार आहे.देशभर गाजत असलेल्या कर्नाटकातील बलात्कार व अपहरण प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतल. बेंगळुरूमधील केआर नगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल असून या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीचे पथक आज त्याच्या घरी चौकशीसाठी पोहोचलं त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
    माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा व कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लैंगिक शोषण व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हैसूर जिल्ह्यातील कृष्णराजा नगर येथील २० वर्षाच्या तरुणाने ही तक्रार दाखल केली असून त्याने म्हटले की, रेवन्नाने त्याच्या आईचे अपहरण केले होते.मागील गुरुवारी महिलेच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर महिला लैंगिक शोषण प्रकरणातील पीडिता असल्याचं सांगितलं जात आहे. तक्रारदार तरुणाने सांगितले की, त्याची आई गेल्या ६ वर्षांपासून एचडी रेवन्ना यांच्या घरी आणि फार्महाऊसवर काम करत होती. मात्र तीन वर्षांपूर्वी तिने रेवन्ना यांच्याकडील काम सोडून गावी जाऊन मोलमजुरीचं काम करू लागली. काही दिवसांपूर्वी रेवन्ना यांच्या जवळचा एक व्यक्ती आला. त्याचे नाव सतीश होते. तो त्याच्या आईला घेऊन बेंगळुरुला गेला. काही दिवसानंतर पुन्हा घरी आणून सोडले.२९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सतीश पन्हा त्यांच्या घरी आला व त्याने पुन्हा महिलेला घेऊन गेले. त्यानंतर १ मे रोजी सतीशचा एक मित्र पीडितेच्या घरी गेला व त्यांच्या मुलाला सांगितले की, त्याच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तक्रारदार तरुणाने सांगितले की, माझ्या आईचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचं त्याने मला सांगितलं, असं या महिलेकडून पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.