इळये वरंडवाडी येथील युवक बेपत्ता.

इळये वरंडवाडी येथील युवक बेपत्ता.

देवगड.

  इळये वरंडवाडी येथील किरण मंगेश सावंत (२८) हा युवक बेपत्ता झाला आहे.याबाबतची तक्रार त्याचा आईने देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.
   याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, इळये वरंडवाडी येथील किरण मंगेश सावंत हा युवक दि. १४ जुलै रोजी सकाळी ८ वा.सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेला.नातेवाईक, आजुबाजुच्या गावात व परिसरात त्याचा शोध घेवूनही तो मिळाला नाही म्हणून त्याची आई मनीषा मंगेश सावंत यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.याबाबत तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.