सिंधुदुर्ग विद्या निकेतनच्या दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून अव्वल

सिंधुदुर्ग विद्या निकेतनच्या दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून अव्वल

 

वेंगुर्ला

 

      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 इयत्ता सातवीची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडिअम स्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.या परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी सोनाक्षी समीर तेंडोलकर हिने ग्रामीण अनुसूचित जाती गटातून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर ऋण्मई तुकाराम साळगावकर हिने ग्रामीण सर्वसाधारण गटातून तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे.दोन्ही विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.