आचरा पोलीस स्टेशनच्या मिनाक्षी देसाई यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

आचरा पोलीस स्टेशनच्या मिनाक्षी देसाई यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

आचरा

 

     आचरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ. मिनाक्षी देसाई यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. नेहमी हसतमुख आणि सहकार्याची भावना असलेल्या पोलीस कर्मचारी म्हणून ओळख असलेल्या मिनाक्षी देसाई यांनी आचरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थांबाबत जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले होते. त्यांना उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.