सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा सावंतवाडी येथे संपन्न.

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्ग महासंघाच्या कार्यकारीणीची मासिक सभा सावंतवाडी येथील खासकीलवाडा भंडारी भवन सावंतवाडी या तालुका भंडारी समाज मंडळाच्या वास्तूमधील कै. सहदेव उर्फ काका मांजरेकर सभागृह येथे महासंघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम उर्फ हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य, पदसिद्ध सदस्य व स्विकृत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ जिल्हाध्यक्ष तुकाराम उर्फ(हेमंत)करंगुटकार, भंडारी युवा जिल्हाध्यक्ष समिल प्रभाकर जळवी, माजी जिल्हाध्यक्ष रमण शंकर वायंगणकर, विकास वैद्य, सावंतवाडी भंडारी तालुकाध्यक्ष दत्तप्रसाद गोपाळ अरविंदेकर, भंडारी जिल्हा सदस्य, प्रियदर्शन अर्जुन कुडव, दिवाकर राजाराम मावळणकर, नामदेव साटेलकर, सिद्धार्ध गुरुनाथ पराडकर, चंदन दयाळ पांगे, दीपक मनोहर कोचरेकर भंडारी समाज बांधव उपस्थित होते.