परुळे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी

परुळे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी

परुळे


      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 7 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या शाळेने पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखली आहे.या परीक्षेत शाळेतील विद्यार्थी कु. अतीश अमेय सामंत याने ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत 67.33 टक्के गुण मिळवत जिल्ह्यात 38 वा आणि वेंगुर्ले तालुक्यात चौथा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर पलाक्षी प्रवीण परुळेकर आणि नील सुशीलकुमार चिपकर यांनीही चांगले गुण मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली.विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांची साथ असल्याचे सांगण्यात आले. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, सचिव ॲड. विशाल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने, शिक्षकवृंद, पालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. या निकालामुळे संपूर्ण परुळे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.