कणकवली बाजारपेठेत बेकायदा जुगारावर पोलिसांचा छापा, ५ जणांवर गुन्हा दाखल

कणकवली बाजारपेठेत बेकायदा जुगारावर पोलिसांचा छापा, ५ जणांवर गुन्हा दाखल

 

कणकवली



     कणकवली बाजारपेठेतील एका लॉजच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदा जुगारावर कणकवली पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 5.15 वाजता 112 क्रमांकावर मिळालेल्या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना येथे काही जण पत्त्यांवर पैसे लावून 'अंदर-बाहर' हा जुगार खेळताना आढळले.यावेळी अशोक रतन भोई वय 55 राहणार नाडकर्णी चाळ कलमठ, शिवा शिवानंद पाटील वय 30 राहणार टेंबवाडी, चेतन विश्वनाथ माने वय 38 राहणार बांदकरवाडी, महेश भिकाजी मोरे वय 44 राहणार नाडकर्णी चाळ कलमठ आणि राजू शिवराम जमादार वय 42 राहणार सोनगेवाडी कणकवली या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत संशयितांच्या अंगझडतीतील रक्कम आणि जुगाराच्या ठिकाणी चटईवर ठेवलेली 8 हजार 200 रुपये अशी एकूण 14 हजार 400 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय 89 पत्ते आणि जुगारासाठी वापरलेली जुनी चटई देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन अशोक माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 मधील कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे आणि पोलीस कॉन्स्टेबल डी. डी. चव्हाण यांच्या पथकाने केली.