वेंगुर्ला येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा मोटारसायकल रॅली संपन्‍न.

वेंगुर्ला येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा मोटारसायकल रॅली संपन्‍न.
वेंगुर्ला येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा मोटारसायकल रॅली संपन्‍न.

वेंगुर्ला.

     वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दिनांक ९ ऑगस्‍ट ते १५ ऑगस्‍ट २०२४ या कालावधीत ‘’घरोघरी तिरंगा’’ हे अभियान साजरे करण्‍यात  येत आहे.या अभियानाअंतर्गत दिनांक १२ ऑगस्‍ट २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय – हॉस्‍पीटल नाका- पॉवर हाऊस – शिरोडा नाका- जुना बस स्‍टॅंड – दाभोली नाका - नगरपरिषद कार्यालय  या मार्गावर तिरंगा मोटारसायकल रॅली संपन्‍न झाली.या रॅलीमध्‍ये मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ, दिलीप गिरप, श्री. सचिन वालावलकर, सुहास गवंडळकर, प्रसन्‍ना देसाई, प्रशांत आपटे, सुनील डुबळे, उमेश येरम, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, बाबली वायंगणकर, सत्‍यवान साटेलकर आदी लोकप्रतिनिधी तसेच बॅं.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.वसंतराव पाटोळे, प्रा. बाळासाहेब गायकवाड, प्रा.जे.वाय.नाईक, वेंगुर्ला हायस्‍कूलचे मुख्‍याध्यापक श्री. कांबळे, क्रिडा शिक्षक जयराम वायंगणकर, डॉ.संजीव लिंगवत‍, वेंगुर्ला नगरपरिषद  प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, नगरपरिषद अधिकारी व कमर्चारी व शहरातील बहुसंख्‍य नागरीक सहभागी झाले होते.या दरम्‍यान घोडेबांव उद्यान येथे तिरंगा शपथ घेण्‍यात आली.या रॅलीमध्‍ये भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा, जय जवान जय किसान या घोषणांनी देशभक्‍तीपर जनभावना निर्माण करण्‍यात आली. 
   वेंगुर्ला नगरपरिषद नागरी सुविधा केंद्र समोर तिरंगा कॅनव्हास तयार करण्‍यात आला असून त्‍यावर नागरीकांनी स्वाक्षरी व घोषवाक्ये नोंदविली. नागरीकांनी आपल्‍या घरावरील राष्‍ट्रध्‍वजासोबत सेल्‍फी काढून किंवा वेंगुर्ला नगरपरिषद नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी सेल्‍फी पॉंईट तयार करण्‍यात आलेला असून याठिकाणी फोटो  काढून harghartiranga.com या शासनाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर अपलोड करावा व ‘’घरोघरी तिरंगा’’ या उपक्रमामध्‍ये वेंगुर्ला शहरातील सर्व नागरिकांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उत्सफूर्तपणे सहभागी व्‍हावे असे आवाहन मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.