चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी अँड मिल्क प्रोडक्टसला स्टार्टअप पुरस्कार जाहीर. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा.लि.चे चेअरमन प्रशांत यादव स्विकारणार पुरस्कार.

चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी अँड मिल्क प्रोडक्टसला स्टार्टअप पुरस्कार जाहीर.   वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा.लि.चे चेअरमन प्रशांत यादव स्विकारणार पुरस्कार.

रत्नागिरी.

  रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्यावतीने चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी अँड मिल्क प्रोडक्टसला स्टार्टअप पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३० जून रोजी चिपळूण येथे होणार असून वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लि. चे चेअरमन प्रशांत बबन यादव हे पुरस्कार स्विकारणार आहेत.
   जिल्हा फेडरेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारापैकी जीवनगौरव पुरस्कारासाठी मत्स्य उद्योगात भरारी घेऊन जागतिक पातळीवर रत्नागिरीचे नाव उंचावणारे नामवंत उद्योजक दिपक गद्रे यांना देण्यात येणार आहे. तर सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लि. चे चेअरमन प्रशांत बबन यादव यांना, सी.एस.आर. पुरस्कार घरडा केमिकल्स लि. लोटे परशुराम या कंपनीला देण्यात येत आहे. जागतिक उद्योजक पुरस्कार स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि.चे उद्योजक निलेश शंकर चव्हाण यांना देण्यात येणार आहे. जिल्हा उद्योजकता पुरस्कार डिलाइट इंडस्ट्रीज प्रा. लि.चे अनिल देवळे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत यांनी दिली. या पुरस्काराची घोषणा दोन महिने पूर्वी फेडरेशनच्यावतीने करण्यात आली होती. उत्पादकता रोजगार निर्मिती एक्सपोर्ट सामाजिक जबाबदारी अशा विविध गोष्टींची पडताळणी करून तज्ञ समितीने या पुरस्कारांची निवड केली आहे.
   अतिशय पारदर्शकपणे योग्य उद्योजकाचा सन्मान होईल याची काळजी घेऊन तज्ञ समितीने प्राप्त झालेल्या अर्जातून या पुरस्कारांची निवड करून त्यांना सन्मानित करण्याचे निश्चित केले आहे. असे राजू सावंत बोलताना म्हणाले. दि. ३० जून रोजी सहकार भवन बहादूर शेख नाका चिपळूण येथे आयोजित करणाऱ्या आलेल्या रत्नागिरी जिल्हा उद्योजकता विकास परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती राजू सावंत यांनी दिली. या उद्योजक परिषदेमध्ये माजी केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार प्राप्त उद्योजकांचे फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत, उपाध्यक्ष धनंजय यादव, सेक्रेटरी केशव भट, रघुवीर सावंत देसाई, राजू जोशी, रत्नागिरी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दिगंबर मगदूम, लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राजेश आंब्रे आणि नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी, दापोली उद्योजक संघटनेचे अध्यक्ष नरवणकर यांनी अभिनंदन केले आहे.