रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाचे स्काऊट गाईड मध्ये घवघवीत यश

रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाचे स्काऊट गाईड मध्ये घवघवीत यश


वेंगुर्ला 
     कणकवली तालुक्यातील तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालय येथे जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावा संपन्न झाला. यामध्ये मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाची स्काऊट -गाईड व कब-बुलबुल अशी चार पथके सहभागी झाली होती. यामध्ये मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाच्या माध्यमिक विभाग स्काऊट यांना शोभायात्रा या स्पर्धेत द्वितीय क्रमांक व बिन भांड्यांचा स्वयंपाक तृतीय क्रमांक प्राप्त झाला तसेच प्राथमिक विभाग बुलबुल  पथकाला बडीसलामी स्पर्धेत द्वितीय क्रमांक व मातीकाम स्पर्धेत यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी संस्थेचे चिटणीस डॉ. विनय राऊत, मुख्य सल्लागार श्री.मधुकर मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पडवळ सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीता मॅडम, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.