माठेवाडा येथील आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

सावंतवाडी.
माठेवाडा येथे महाआरोग्य शिबिर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी 88 रुग्णांनी लाभ घेऊन 36 रुग्णांनी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी बुधवार पाठवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जीवन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली.दरम्यान या शिबिराचे उद्घाटन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉ. सुदेश कुमार मुळीक मार्केटिंग मॅनेजर दिनेश डावरे व कॅम्प संयोजक डॉ.मयूर जाधव दिग्विजय पाटील पी.आर. ओ विवेक चव्हाण पी.आर.ओ अमोल फाले पी.आर.ओ मा. सुनील कोरगावकर कु.वैष्णवी बोंद्रे मा. मनोहर जगताप गवळी वगैरे मान्यवर या शिबिराच्या शुभारंभाला उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व सावंतवाडी तालुक्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थितीत होते यामध्ये जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत गेली दहा वर्षे माझ्या मार्फत हजारो संख्येने रुग्णांना आरोग्य योजनेचा मोफत लाभ घेऊन विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया औषधे व जेवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना मोफत लाभ घेतला आहे.