पोईप येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन.

पोईप येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन.

मालवण. 

  उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 च्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत "कृषी माहिती केंद्राचे " उद्घाटन ग्रामपंचायत पोईप येथे करण्यात आले.
   मुळदे कृषी विद्यापीठाचे उईके सर, पालांडे सर यांनी ग्रामस्थांनी विद्यार्थीन कडून नवीन तंत्राची माहिती करून घ्यावी, आपले शेती विषयक प्रश्न त्यांना सांगावे. त्यावर मार्गदर्शन घ्यावे असे मार्गदर्शन केले. सरपंच श्रीधर नाईक, उपसरपंच मनाली नाईक, ग्रामसेवक सडवेलकर मॅडम, ग्रामपंचायत सभासद, ग्रामस्थ व कृषी कन्या कु. प्राची मोरे, कु. साक्षी कडव, कु. अन्नू पॉल, कु. ऋतुजा पाटील, कु. नेहा गावठाणकर, कु. प्रणिता बिरादार इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी कडव यांनी केले