निवती मेढा येथील केळुसकर कुटुंबांनी साकारला बाळू मामाचा देखावा.

वेंगुर्ला.
तालुक्यातील निवती मेढा गावातील केळुसकर कुटुंबांनी गणेश मूर्ती सोबत बाळू मामा चा देखावा केला असून हा देखावा केळूसकरांच्या गणपती दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांचे डोळ्यांचे पारणे फेडत आहे.केळुसकर कुटुंब गेली 15 वर्ष अश्या प्रकारचे देखावे करत आहे.दरवर्षी एक वेगळा देखावा ते गणेश चतुर्थीच्या वेळी बनवत असतात.अश्या देखाव्यांना जिल्हा तसेच राज्यस्तरीय पातळीवर पारितोषिक मिळाले असून याचा उद्देश समाज प्रबोधन करून प्रबोधनात्मक संदेश देणे असे केळुसकर कुटुंबाच म्हणण आहे.बाळू मामाच्या अनेक लीला पैकी एक लीला असणारे हे दृश्य यावर्षी या कुटुंबाकडून साकारण्यात आले.