ओसरगाव तलावामध्ये स्थानिक युवकांनी बनवला साध्या पद्धतीचा तराफा. स्थानिक युवकांना बोटिंगचं प्राधान्य देण्याचा प्रयत्न.
कणकवली
तालुक्यातील ओसरगाव गावातील तलावामध्ये स्थानिक युवकांनी साध्या पद्धतीचा तराफा बनवला आहे.स्वखर्चाने बनवलेला हा तराफा स्वतःच्या जबाबदारीवर प्रायोगिक तत्त्वावर बोटिंग करण्याचा प्रयत्न केला गेला.भविष्यात स्थानिक युवकांना बोटिंगचं प्राधान्य देण्यासाठी स्थानिक युवकांनी केलेला हा प्रयत्न आहे. ओसरगाव तलावाला दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळत असल्यामुळे नवीन काही संकल्पना गावातील तरुण मंडळी करत असतात त्यामुळे स्थानिक युवकांना देखील रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तालुक्यातील हॉटस्पॉट म्हणून ओसरगाव तलावाकडे पाहिले जाते येणाऱ्या काळात तलावाच्या आजूबाजूच्या परिसरात स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबवले जाणार असा विश्वास येथील लोकांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी माजी उपसरपंच बबली राणे अक्षय राणे,नितीन धुरी,अक्षय शिंदे,सुरज कदम,सुनील राणे,महेश वारंग,चेतन राणे,किरण राणे,सोहेल शेख व गवळवाडीतील स्थानिक युवक उपस्थित होते.