सिंधुदुर्ग महाविद्यालयात 'वीरांगना वेशभूषा स्पर्धा' संपन्न......कनिष्ठ महाविद्यालयीन गटात मिताली मसुरकर तर खुल्या गटात मिताली कोरगांवकर प्रथम

सिंधुदुर्ग महाविद्यालयात 'वीरांगना वेशभूषा स्पर्धा' संपन्न......कनिष्ठ महाविद्यालयीन गटात मिताली मसुरकर तर खुल्या गटात मिताली कोरगांवकर प्रथम

 

 

मालवण 

 

       कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५ - २६ निमित्ताने महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या संयुक्त विद्यमाने 'वीरांगना भारतातील शूर स्त्री योद्ध्या' वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली. भारतीय इतिहासातील किल्ल्यांशी निगडित अनेक स्त्रियांनी शौर्य, त्याग आणि पराक्रमाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभू झांट्ये सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर कोमसाप केंद्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक तज्ञ वैशाली पंडित यांच्यासह किल्ले प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, टॅक्स कन्सल्टंट हेमंत वालकर, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, स्वराज्य ढोल पथकाच्या संस्थापक शिल्पा खोत, नाट्य कलावंत शुभदा टिकम, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. उज्वला सामंत उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पर्यटन सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या 'किल्ले वाळूशिल्प' स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. यावेळी किल्ले प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे व स्वराज्य ढोल पथक संस्थापक सौ. शिल्पा खोत यांनी मनोगत व्यक्त केले. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक सृष्टी कुमठेकर, उत्तेजनार्थ द्वितीय गार्गी मालवणकर, तृतीय संचिता बागडे, द्वितीय मैथिली गावडे व प्रथम पारितोषिक मिताली मसुरकर यांना प्राप्त झाले. तर खुल्या गटात उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक अर्चिता राणे, उत्तेजनार्थ द्वितीय स्नेहल चव्हाण, तृतीय जान्हवी परुळेकर, द्वितीय श्रावणी गावडे व प्रथम पारितोषिक मिताली कोरगांवकर यांना प्राप्त झाले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच गिरीजा परुळेकर या छोट्या बालिकेने स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास अभ्यासक तज्ञ वैशाली पंडित व नाट्य कलावंत शुभदा टिकम यांची उपस्थिती लाभली. 
    यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, समन्वयक डॉ. उज्वला सामंत, आय. क्यू. ए. सी. प्रमुख डॉ. सुमेधा नाईक, प्रा. प्रमोद खरात, डाॅ. एच. एम. चौगले, डॉ. एम. आर. खोत, डॉ. देविदास हारगिले, प्रा. स्नेहा बर्वे, अन्वेषा कदम, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक - कर्मचारी वर्ग तसेच सौ. शिल्पा खोत, श्रावण गवळी, अस्मिता रावराणे, शांती तोंडवळकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. उज्वला सामंत यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले.