जामसंडे येथे १८ ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सव.

जामसंडे येथे १८ ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सव.

देवगड.

    देवगड येथील जामसंडे मध्ये कै.मोरेश्वर जनार्धन गोगटे, सांस्कृतिक भवन येथे रानभाज्या महोत्सव १८ ऑगस्ट रोजी आयोजित आले आहे. माजी आमदार ॲड.अजित गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली या रानभाज्या महोत्सव मध्ये रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व रोजच्या आहारात रानभाज्यांचा वापर याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या महोत्सवामध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री तसेच रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे तसेच उमेद अभियान आणि माविम यांच्याकडील महिला बचतगटांचा देखील समावेश असणार आहे. औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा आपल्या रोजच्या आहारात वापर वाढावा याकरिता आपण व आपला परिवार उपस्थित राहावे व याबद्दलची माहिती घ्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी केली आहे.