न्यू इंग्लिश हायस्कुल कसबा संगमेश्वरच्या दहावी बॅच २००१ चा स्नेहमेळावा संपन्न
संगमेश्वर
न्यू इंग्लिश हायस्कूल कसबा संगमेश्वर च्या दहावी बॅच २००१ मधील सर्व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा प्रशालेमध्ये अतिशय उत्साहामध्ये पार पडला. सदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन माजी विद्यार्थ्यांमधून प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव तसेच प्रशाले कडून श्री. गावडे यांनी करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदर कार्यक्रमास निमंत्रित प्रशालेचे माजी शिक्षक सौ. माधुरी, जाधव व बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेचे माजी प्राचार्य श्री मनेर व सौ मनेर यांना प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी व्हॉट्सअँप मेसेज द्वारे आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.सदर कार्यक्रमास प्रशालेचे विद्यमान प्राचार्य श्री शेख, पर्यवेक्षक श्री पटेल, गावडे, पडवळ, मोहिते व संस्थेचे शिपाई सुरज गीते उपस्थित होते. श्री शेख व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमधून स्नेहा पवार, आशिष बल्लाळ, मोहसीन बोट, सागर सुर्वे, नम्रता शेवडे, नूतन मोरे, ज्ञानदा जोशी, श्रद्धा इंदुलकर, महेश जाधव, योगेश मोहिते व प्रवीण जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून प्रशालेविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.सदर कार्यक्रमाची आठवण म्हणून निसर्गप्रेमी आशिष बल्लाळ यांच्या संकल्पनेतून शाळेमध्ये फुलझाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच बॅच २००१ कडून शाळेला भेटवस्तू म्हणून साऊंड सिस्टम प्रदान करण्यात आली.

konkansamwad 
