मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करा: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस.

सिंधुदुर्ग.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनी लॉड्रिंग अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कडून होत आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले आहे. या पत्रात असे लिहिले आहे की,भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्त्वाचा कबुलीजबाब दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत. आमदार गणपत गायकवाड यांचा कबुलीजबाब हाच एफआयआर समजून हे मनी लॉण्डरिंगचे प्रकरण आहे या दिशेने तपास व्हायला हवा.अशी मागणी जिल्हा काँग्रेस कडून जोर धरते आहे.आमदार गणपत गायकवाड यांचा जबाब घेऊन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनप्रमाणे शिंदे यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे. हे कोट्यवधी रुपये कुठून आले, हा पैसा गुन्हेगारीतून आलेला पैसा आहे की भ्रष्टाचाराचा पैसा की आणि कुठून? व हा पैसा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे. हे सरळ मनी लॉण्डरिंगचे प्रकरण आहे व त्याबद्दल त्यांना 'पीएमएलए' कायद्याने अटक व्हायला हवी. तरी याचा तातडीने तपास होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई व्हावी.अशी मागणी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, जिल्हा चिटणीस कृष्णा धाऊसकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,सावंतवाडी सेवादल तालुकाध्यक्ष संजय लाड,सावंतवाडी तालुका सरचिटणीस चंद्रकांत राणे,युवक प्रतिनिधी सखाराम शेटकर आदी उपस्थित होते.