दोडामार्ग येथील हळबे महाविद्यालयात १४ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन.

दोडामार्ग येथील हळबे महाविद्यालयात १४ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन.

दोडामार्ग.

   नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित लक्ष्मीबाई सिताराम हळबे, महाविद्यालय दोडामार्ग च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त  सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग तर्फे सोमवार दि १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या रक्तदान शिबिराचा महाविद्यालयाच्या आजी - माजी विद्यार्थी - पालकांनी, शिक्षक, शिक्षणप्रेमींनी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रक्तदान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन हळबे कॉलेजच्या वतीने करण्यात येत आहे.