खासदार नारायण राणे यांनी केले मनिष दळवी व कुटुंबीयांचे सांत्वन

खासदार नारायण राणे यांनी केले मनिष दळवी व कुटुंबीयांचे सांत्वन

 

वेंगुर्ला
 

     सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान खासदार नारायण राणे यांनी मनिष दळवी यांची होडावडा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी सौ. नीलमताई राणे, भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पप्पू परब, वसंत तांडेल, प्रितेश राऊळ, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, राजबा सावंत आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.