चेन्नई मध्ये आढळला समद्राचा रंग अर्धा लाल आणि अर्धा निळा.

चेन्नई मध्ये आढळला समद्राचा रंग अर्धा लाल आणि अर्धा निळा.

चेन्नई.

  चेन्नई मधल्या पुद्दुचेरीच्या वैथिकुप्पम मध्ये देश-विदेशातील अनेक लोक फिरायला येत असतात. हे एक खूप महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे.उत्तर किनाऱ्यावरील वैथिकुप्पम ते गांधी पुतळ्यापर्यंत किनारपट्टीच्या पाण्याचा संपूर्ण भाग लाल झालाय. आता हा समुद्र अर्धा लाल आणि अर्धा निळा दिसतोय.समुद्र हा प्रत्येकाच्या  जिव्हाळ्याचा विषय असल्याने पर्यटकांमध्ये आश्चर्यच वातवरण आहे.अर्धा निळा,अर्धा लाल समुद्र त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. शेवटी शास्त्रज्ञांनी जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा लाल रंगाचं दुसरं-तिसरं काहीही नसून शेवाळ असल्याचं समोर आले आहे समुद्राचा रंग जो अचानक लाल झाला तो औद्योगिक प्रदूषणामुळे झाला असल्याचं कोस्टल मॅनेजमेंट एक्स्पर्ट आणि पॉँडिकन या नागरी संस्थेच्या सदस्यांच  मत आहे. आता या शेवाळाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.गेल्या आठवडाभरात पुद्दुचेरीच्या वैथिकुप्पम आणि समुद्रकिनाऱ्याच्या इतर काही भागात ही घटना घडली आहे. हे एक प्रकारचं रेड टाइड शेवाळ असून सागरी जीवनासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं म्हटलं जातंय. इतर राज्यातील अनेक ठिकाणी समुद्राचा रंग हिरवा पाहायला मिळाल्याच्या नोंदी आहेत.लाल रंगाचा हा समुद्र पुन्हा निळा करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करतायत, पर्यटकांनासुद्धा तिथे जायला मनाई करण्यात आलीये.