खुल्या चित्रकला स्पर्धेत दिक्षा, काशिनाथ, रुजुल अव्वल तर रंगभरण स्पर्धेत भूमी, भार्गवी प्रथम. वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने सलग १० व्या वर्षी स्पर्धेचे आयोजन.

वेंगुर्ला.
अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत आयोजित सलग १० व्या वर्षी खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील भावी चित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सुमारे २८८ पेक्षा जास्त मुलांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन तुळस श्रीदेव जैतिराश्रीत संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रभानंद सावंत यांच्या हस्ते तर तुळस सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशपूजन करून करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर तुळस उपसरपंच सचिन नाईक, लोकमान्य को ऑपरेटिव्ह बँक चे पुंडलिक राऊळ आणि चक्रपाणी गवंडे, शितल नाईक, सगुण माळकर, सुजाता पडवळ, प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष प्रदीप परुळकर, संदीप तुळसकर, बबन घोडे - पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
वेताळ प्रतिष्ठान सलग दहा वर्षे जिल्ह्यातील कला, क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रातील नवोदितांना व्यासपीठ निर्माण करून देत असून त्यांच्या इतर सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन नेहमीच होत असते असे गौरवोद्गार ॲड. प्रभानंद सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना केले.सरपंच रश्मी परब यांनी अबाल वृध्दासाठी प्रतिष्ठान उपक्रम राबवत असल्याबद्दल कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.लोकमान्य बँक चे चक्रपाणी गवंडे यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत असे प्रतिपादन करताना लोकमान्य बँक च्या विविध योजनांची माहिती दिली.
या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे -
रंगभरण स्पर्धा :(बालवाडी गट) -
प्रथम क्रमांक : भार्गवी प्रशांत धुरी (आसोली).
द्वितीय क्रमांक : स्पृहा समीर तेंडोलकर (सिंधुदुर्ग विद्या निकेतन).
तृतीय क्रमांक : शुभ्रा मनोजकुमार ठुंबरे (तुळस).
उत्तेजनार्थ प्रथम : गंश ओंकार परब ( तुळस).
उत्तेजनार्थ द्वितीय : श्रीराज उत्तम कोंडुसकर ( होडावडे).
रंगभरण स्पर्धा (गट पहिली ते दुसरी) -
प्रथम क्रमांक : भूमी सचिन परुळकर (श्री वेताळ विद्या मंदिर तुळस).
द्वितीय क्रमांक : विरक्ती रामचंद्र वरगावकर (मातोश्री पार्वती राऊत विद्यालय,रेडी).
तृतीय क्रमांक : ज्ञानदेव नारायण राऊळ (श्री वेताळ विद्या मंदिर तुळस).
उत्तेजनार्थ प्रथम : आराध्या मंदार राऊळ (वेंगुर्ला नंबर ४).
उत्तेजनार्थ द्वितीय : आराध्या अजित म्हापणकर (केंद्र शाळा पाट नंबर १).
चित्रकला स्पर्धा (तिसरी ते चौथी) -
प्रथम क्रमांक : रुजूल योगेश सातोसे (जि.प.प्राथ. शाळा पांडुरंग पडते शेठ, कुडाळ).
द्वितीय क्रमांक : सिया भरत गावडे (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन).
तृतीय क्रमांक : गार्गी दत्तगुरु भोगण (मिलाग्रिस प्रायमरी स्कूल).
उत्तेजनार्थ प्रथम : पूर्णिमा महादेव पेडणेकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन).
उत्तेजनार्थ द्वितीय : रघुनाथ संदीप पिंगुळकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन).
चित्रकला स्पर्धा (इ. पाचवी ते सातवी) -
प्रथम क्रमांक : काशिनाथ संतोष तेंडोलकर ( मठ नंबर १)
द्वितीय क्रमांक : राशी योगेश सातोसे (के.एम.एस.पी. मंडळ इंग्लिश स्कूल, कुडाळ)
तृतीय क्रमांक : तन्मय पुरुषोत्तम नेरुरकर (शाळा नेरुर नंबर. १)
उत्तेजनार्थ प्रथम : जय सिद्धेश तांडेल (केंद्रशाळा उभादांडा नंबर १)
उत्तेजनार्थ द्वितीय : सर्वेश विकास मेस्त्री (जि.प.शाळा वेंगुला नंबर.३)
चित्रकला स्पर्धा (इ. आठवी ते दहावी) -
प्रथम क्रमांक : दिक्षा राजन पालकर (अणसुर-पाल हायस्कूल).
द्वितीय क्रमांक : केतकी संतोष रेडकर (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन).
तृतीय क्रमांक : विष्णू उदय आरोलकर (दाभोली हायस्कूल).
उत्तेजनार्थ प्रथम : प्रिया प्रदीप देसाई (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी).
उत्तेजनार्थ द्वितीय : साहिल लक्ष्मण सातार्डेकर. (जनता विद्यालय तळवडे) यानी पारितोषिक पटकाविले.
स्पर्धेचे परीक्षण पंकज घोगळे आणि आशिष कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर यांनी तर सागर सावंत यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.सचिन परुळकर, महेश राऊळ, मिलन तिरोडकर,मंगेश सावंत, माधव तुळसकर,वैष्णवी परुळकर,सुधीर चुडजी,विधी नाईक, रोहित गडेकर, किरण राऊळ, हेमलता राऊळ, सानिया वराडकर,यशवंत राऊळ ,सचिन गावडे,जान्हवी सावंत, प्रातिक परुळकर यांनी प्रयत्न केले.