उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते, मंत्री आणि आमदारांसह सिध्दीविनायकाचे घेतले दर्शन.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते, मंत्री आणि आमदारांसह सिध्दीविनायकाचे घेतले दर्शन.

मुंबई.

    राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार गटाची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. सध्या हे सर्व पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी जोमाने तयारीला लागले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील सर्व आमदार आणि मंत्रीही उपस्थित होते.
   यावेळी आगामी विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून बाप्पाला साकडं घालण्यात आलं आहे.‘येत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळू दे’ असं साकडं अजित पवारांसह सर्व आमदारांकडून सिद्धिविनायकाला घालण्यात आले. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील यांसह सर्व महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित होते.
   राज्यात काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला यश मिळाले नव्हते. त्यातच काल राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. या बैठकीत पक्षाची पुढची वाटचाल कशी असणार आहे, कशा पद्धतीने प्रचार करायला हवा, याबद्दलची रणनिती ठरवण्यात आली. अजित पवार त्यांच्या सर्व आमदारांसह कालच सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार होते. मात्र काल  मुंबईतील मुसळधार पावसामुळे आज या सर्व आमदारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.