आरवली येथील कर्णेकर यांना वेंगुर्ला भाजप कडून आर्थिक मदतीचा हात.

आरवली येथील कर्णेकर यांना वेंगुर्ला भाजप कडून आर्थिक मदतीचा हात.


वेंगुर्ला
  आरवली देऊळवाडी येथे ३ जुलै रोजी शाॅर्ट सर्किटने बाळकृष्ण बळवंत कर्णेकर यांच्या घरातील आतील भागाचे नुकसान झाले होते. काही दिवसापूर्वी रेडी जि.प.मधील भाजप पदाधिकारी यांनी त्यांना भेटून तेथील वस्तुस्थिती बघून व्हॅाटसपच्या माध्यमातून त्यांना मदत मिळण्यासाठी आव्हान केले होते. त्यांची दखल घेऊन राजन तेली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप वेंगुर्ला तालुका कडून त्यांना आर्थिक मदत देण्याचे ठरविण्यात आले. त्या प्रमाणे मा.राजन तेली  यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने घरमालकास  आर्थिक मदत देण्यात आली.
    यावेळी मान्यवर म्हणून भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, उपतालुकाध्यक्ष मनवेल फर्नाडिस, आरवली ग्रामपंचायत भाजप सरपंच तातोबा कुडव, लक्ष्मीकांत कर्पे, रेडी जि.प.माजी सदस्य प्रितेश राऊळ, आरवली,आसोली, रेडी शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे महादेव नाईक, विजय बागकर, जगन्नाथ राणेआरवली भाजप ग्रामपंचायत सदस्य अनुक्रमे समिर कांबळी,सौ.सायली कुडव,सौ.रिमा मेस्त्री,भाजप हिंतचिंतक आरवली ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मेस्त्री,भाजप आरवली ग्राम कमिटी पदाधिकारी विश्वनाथ उर्फ भाई शेलटे,सुभाष कांबळी,रवींद्र कुडाळकर,सौ.नंदिनी आरोलकर,सौ.सावरी शेलटे,भाजप आय.टी जिल्हा प्रमुख केशव नवाथे,भाजप आरवली हिंतचिंतक संतोष मातोंडकर,सागरतीर्थ ग्राम कमिटी भाजप पदाधिकारी देवेंद्र उर्फ बाळू वस्त,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,शिरोडा ग्रामपंचायत माजी भाजप सरपंच मनोज उगवेकर,माजी उपसरपंच राहुल गावडे,भाजप शिरोडा शहर पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,दत्ताराम फटजी,शिरोडा ग्रामपंचायत भाजप सदस्य मयूरेश शिरोडकर उपस्थित होते.