पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते परुळे येथील प्लास्टिक व्यवस्थापन युनीट प्रकल्पाचे उद्घाटन.
वेंगुर्ला.
तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन युनीट प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. वेंगुर्ला तालूक्यातील हा पहिला प्लास्टिक वर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे जो परूळेबाजार ग्रामपंचायतीने पूर्ण केला आहे.
यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, उपमुख्य कार्यकारीअधिकारी विनायक ठाकूर, तहसिलदार वेगुर्ला ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी पुनम राणे, भारतीय जनता पक्षाचे प्रभाकर सावंत, बाळू देसाई, माजी सभापती निलेश सामंत, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभु, अभय परुळेकर, तन्वी दुधवडकर, सीमा सावंत, प्राजवता पाटकर, पुनम परुळेकर, नमिता परुळेकर, ग्रामसेवक शरद शिंदे, स्वच्छता विभागाचे निलेश मठकर, जनजीवन मिशनचे श्री टिपणीस, उपअभियंता शिंदे, यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रा.पं.परुळे बाजार यांजकडून उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.पालकमंत्री यांनी यावेळी तालुक्यातील पहिला घनकचरा प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल व तसेच अभियानातील यशाबद्दल ग्रामपंचायतीचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.
प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध सामूहिक जागृती करण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन युनिट प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. डिस्पोझेबल आणि सिंगल-युज प्लास्टिक वाढत्या उत्पादनामुळे प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण ही एक चिंताजनक बाब आहे, ते कमी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.असे पाऊल उचलल्याबद्दल परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले.