मेघना जोशी यांच्या 'अक्षरांच्या कविता' काव्यसंग्रहाचे प्रकाशन.
मालवण.
काव्य हे वेदनेतून निर्माण होते असे जरी असले तरी मेघना जोशी यांनी लहान मुलांना अक्षरांची गोडी लागावी यासाठी काव्य लिहिले आहे. हे या काव्यसंग्रहाचे वेगळेपण आहे. हा काव्य संग्रह जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहचला पाहिजे असे प्रतिपादन रेणूका दांडेकर यांनी संस्कार हॉल मालवण येथे आयोजीत मेघना जोशी यांच्या 'अक्षरांच्या कविता' काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने बोलताना केले.
आस्था ग्रुप मालवण यांच्या सहकार्याने कवीयत्री मेघना जोशी यांच्या 'अक्षरांच्या कविता' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संस्कार हॉल येथे संपन्न झाले. यावेळी रेणूका दांडेकर या बोलत होत्या. याप्रसंगी मेघना जोशी, डॉ. अमोल झाटये, मालविका झाटये, डॉ. राजेश्वरी वझे, संजय जोशी, आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, डॉ. राहुल पंतवालावलकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दिगंबर सामंत, विजय कामत, डॉ.सुभाष दिघे, वंदना करंबळेकर, मनिषा वालावलकर, बबन परुळेकर, उज्वला सामंत, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल वेंगुर्लेकर, निशीकांत पराडकर, बबन परूळेकर, मंदार औरसकर, शैलेश पावसकर, श्रीकांत बांदेकर, सौ. जयश्री हडकर, सौ. मिना घुर्ये, सौ.नेहा कोळंबकर, निलीमा जारोलकर, पार्थ केळुसकर, वंदना कांदळकर, महेश नाईक, सुनील गोसावी, सौ. श्रुती पई, मिहीका
केनवडेकर, दर्शना चव्हाण, डॉ. जुई देसाई, विनायक सावंत, अरुण परब, महेंद्र मातोंडकर, महेंद्र पराडकर, रेजिना डिसोजा, एस. बी. माने, विजय बोवलेकर, रत्नाकर कोळंबकर, उन्मेश पेडणेकर, सौ. श्रद्धा पेडणेकर, स्वती पाटकर, सुनीता कामत, बाळकृष्ण माणगावकर, विनायक सामंत, उर्मीला गवंडी, सुनेषा परब, उज्ज्वला चव्हाण, साईनाथ चव्हाण, प्रिया पावसकर, कृतिका न्हिवेकर, पुष्पा माडी, अॅनिवेदिता मयेकर, वासुदेव काजरेकर, चेतन मुणगेकर, हर्षाली चव्हाण, स्वाती पारकर, गौरी कुमामेकर, निलीमा मालडकर, संध्या पाटकर, नुपुर पेडये, नयना पोयेकर, संध्या पाटकर, मनिषा वालावलकर आदी उपस्थित होते. प्रारंभी गणेश वंदना वृंदा पंतवालावलकर हिने म्हटली. प्रास्ताविक व परिचय संजय जोशी यांनी केले, सीमा माराठे यांनी पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मेघना जोशी यांनी काव्यसंग्रहाची निर्मिती होत असताना संकटातून जावे लागले. परंतु माझ्यावर प्रेम करणारा असंख्य मित्र परिवार वाचकांच्या प्रेमाने मला ताकद दिली आणि अक्षरांच्या कविता या काव्यसंग्रहाने आकार घेतला. मी पोळी लाटत असताना मला कविता सुचतात, याच कवितांनी शब्दांच्या माध्यमातून आकार घेतला आणि काव्य साकारले गेले. तर पुस्तकाचे परीक्षण करताना जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांनी पुस्तकातील कवितांची मांडणी आणि निर्मिती कशाप्रकारे झालेली असून त्याबद्दल भविष्यात बाल वाचकांना कशाप्रकारे याची आवड निर्माण होईल यावर भाष्य करताना त्यांनी हसत खेळत शिक्षणावर अनेक गोष्टी केल्या जात असताना अक्षरातून मुलांना कवितांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने निर्मीती हा कविता संग्रह लहान मुलांसाठी दिशादर्शक ठरेल, असे ते म्हणाले.
यावेळी पुस्तकाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण सहकार्य करणारे तसेच मुखपृष्ठाचे चित्र रेखाटणारे विजय परुळेकर यांचा सत्कार यावेळी डॉ. सुमेध जोशी यांच्याहस्ते करण्यात आला. काव्यसंग्रहातील कवितांचे कविता वाचन मीरा अभिजीत परब, लिशा मनोज चव्हाण, दुर्वा महेंद्र पराडकर, शौनक शैलेशपावसकर, कृपा मंदार केणी यांनी केले. यावेळी डॉ. अमोल झांटये, सीमा मराठे, राजेश्वर वझे यांनी मनोगत व्यक्त केले. आस्था ग्रुपचे मनोज चव्हाण, बंटी केनवडेकर, संग्राम कासले, प्रशांत हिंदळेकर, आगोस्तीन डिसोजा, रवी मिटकर, उमेश शिरोडकर, कुणाल मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, विघ्नेश मांजरेकर, अनिकेत फाटक, पंकज गावडे आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन मैत्रेयी बांदेकर यांनी केले. शेवटी आभार संजय जोशी यांनी मानले.