सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभारी कार्यभार विलास गावडे यांच्याकडे

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभारी कार्यभार विलास गावडे यांच्याकडे

 

सिंधुदुर्ग

 

       सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभारी कार्यभार विलास गावडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख हे आरोग्याच्या कारणास्तव बाहेरगावी जात असल्यामुळे त्यांच्या जागेवर गावडे यांना नेमून घेण्यात आले आहे. श्री. गावडे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये जबाबदारीची पदे स्वीकारलेली आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता हे पद रिक्त राहू नये यासाठी त्यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आलेला आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिले आहे.