अखेर उर्वरित त्या दोन खलाशांचे मृतदेह सापडले. वेंगुर्ला बंदरातील होडी दुर्घटना.

अखेर उर्वरित त्या दोन खलाशांचे मृतदेह सापडले.   वेंगुर्ला बंदरातील होडी दुर्घटना.

वेंगुर्ला.

 

   वेंगुर्ला बंदरात बोट उलटल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती यामधे बोट उलटल्यामुळे सात खलाशी बुडाले होते. त्यापैकी तीन खलाशांनी पोहून किनारा गाठला होता त्यामुळे त्यांच्या जीव वाचला. यापैकी चार खलाशी बेपत्ता झाले होते.त्यातील महादेव आंबेरकर व शिवराम कोल या दोन जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित दोन मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.दरम्यान आज शनिवार सकाळी सागरेश्वर व नवाबग किनारी आझान कोल व चांद महम्मद यांचे मृतदेह सापडले आहेत. अशी माहिती वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

  या शोध मोहिमेमध्ये मत्यव्यवसाय विभाग, कस्टम विभाग, मेरीटाईम बोर्ड, भारतीय तटरक्षक दल, सागरी सुरक्षा रक्षक, सागर मित्र, पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल विभाग, स्थानिक मच्छीमार, नागरिक सहभागी होते.