वेंगुर्ला येथे पर्यटन उद्योगाला आकार देण्यासाठी कोर्सचे आयोजन.

वेंगुर्ला येथे पर्यटन उद्योगाला आकार देण्यासाठी कोर्सचे आयोजन.

वेंगुर्ला.

   कोकणाला देश विदेशातील उच्च दर्जाचे जबाबदार पर्यटक हवे आहेत व त्यासाठी गावागावात नैतिक पर्यटन व्यवस्था स्थापित करणारे लिडर्स तयार होणे गरजेचे आहे. यासाठी मुंबई विद्यापिठ अंतर्गत बॅ. खर्डेकर महाविद्यालय व कोंकण ट्रॅव्हल क्लब, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने 'इको टुरिझम : डिप्लोमा कोर्स व नेचर गाईड ट्रेनिंग' हा कोर्स सुरु करण्यात येणार आहे.
   डिप्लोमा इन इको-टुरिझम हा १ वर्षाचा तर लोकल फील्ड एक्स्पर्ट सर्टिफिकेट हा ३ महिन्यांचा कोर्स आहे. प्रत्येक आठवड्याला दोन सत्रे होणार आहेत. कोकणातील वाढत्या पर्यटन उद्योगाला आकार देऊन त्याची जगात एक वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण आवश्यक आहे. या उद्देशाने वरील कोर्स घेण्यात येणार आहे. हा कोर्स ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ.धनश्री पाटील (९१४६४३४५६०), प्रा. वसंत नंदगिरीकर (९८६०६२६२७६), प्रतिक गावडे (८६६९८१०४८५) किवा निलेश चेंदवणकर,(७३८७९६४४१६) यांच्याशी संपर्क साधावा.