हळवल फाटा येथे चालत्या ज्युपिटर दुचाकीला आग

हळवल फाटा येथे चालत्या ज्युपिटर दुचाकीला आग

 


कणकवली


      मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली हळवल फाटा येथे वागदेच्या दिशेने जाणाऱ्या ज्युपिटर दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. भर रस्त्यात दुचाकीमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर परिसरात काही नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत तपास सुरू आहे.