आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी उभादांडा येथील ९ तरुणांची रेस्क्यू टीम सज्ज.
वेंगुर्ला.
उभादांडा ग्रामपंचायतच्या वतीने व सरपंच निलेश चमणकर यांच्या संकल्पनेतून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत पूरस्थितीत मदत करण्यासाठी ९ जणांची रेस्क्यू टीम कार्यरत करण्यात आली आहे. याबाबत वेंगुर्ला तहसीलदार व वेंगुर्ला पोलीस स्टेशन यांना सरपंच निलेश चमणकर यांनी पत्र दिले आहे. या रेस्क्यू टीम मध्ये उभादांडा गिरपवाडी मुठ येथील एकूण ९ अनुभवी लाईफ गार्ड यामध्ये ललित सतीश गिरप ७७९८७२११९०, सदाशिव पांडुरंग गिरप ९१५८६६५२२६ , करण एकनाथ तांडेल ९६३७१४५८९१, पूर्वेश् हेमंत तोरसकर ७२६४८२९०, रावजी वामन आरावंदेकर ९६७३७५५५४८, सुरज रमाकांत तोरस्कर ९५४५८५२३२०, हर्षद अशोक सावंत ९६२३६६२१८०, लक्ष्मीकांत कृष्णा केळुस्कर ९११२०८३९०८ व मंदार गिरीश मसुरकर ९१६८४७०४४९ हे उभादांडाचे सर्व तरुण समाविष्ट आहेत. हे सर्व गोवा येथे लाईफ गार्ड म्हणून कार्यरत असून आपत्कालीन परिस्थितीत पाण्यात बुडणाऱ्याला वाचवण्याचा चांगला अनुभव असून त्यांच्याकडे एकूण १५ लाइफ जॅकेट उपलब्ध आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जरी कोणत्याही भागात आपत्कालीन परिस्थिती पूरस्थिती उद्धवल्यास ते उपलब्ध असणार आहेत. आवश्यकता भासल्यास निलेश चमणकर ९४२३३०११०६ , ललित गिरप ७७९८७२११९० यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार ओंकार ओतारी यांनी अशा रेस्क्यू टीम स्तुत्य उपक्रम असल्याचे म्हटले आहे.