वेंगुर्ला पंचायत समितीची आमसभा ३१ ऑगस्ट रोजी
वेंगुर्ला
वेंगुर्ला पंचायत समितीने सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा आणि सन २०२६-२७ या वर्षात करावयाच्या विकास कामे व विविध योजनांबाबत विचारविनिमय करण्यासाठी पंचायत समिती वेंगुर्लाची आमसभा आयोजित करण्यात आली आहे.ही आमसभा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, कॅम्प, वेंगुर्ला येथे होणार आहे. सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार आहे.सदर आमसभेस संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
konkansamwad 
