माजगाव येथील निराधार भगिनींना यशवर्धन राणे यांच्याकडून मदतीचा हात.
सावंतवाडी.
तालुक्यातील माजगाव ख्रिश्चनवाडी येथील डिसोजा कुटुंबातील तिघी दिव्यांग भगिनी मातृछत्र हरपल्यानंतर अनाथ झाल्या होत्या.त्यांना आधार देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन एका वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आले होते. याबाबतची माहिती युवा फोरम भारतचे संस्थापक ॲड.यशवर्धन राणे यांना समजताच ते तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धावून गेले.प्रत्येक महिन्याचे रेशन आणि जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा संकल्प त्यांनी केला.
वीस वर्षांपूर्वीच या बहिणींचे पितृछत्र हरपले.त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला.लोकांची धुणीभांडी करून या माय लेकी आपला उदरनिर्वाह चालवत असत. काही दिवसांपूर्वी या भगिनिंचे मातृछत्र देखील हरपल्यामुळे त्या पूर्णतःअनाथ झाल्या होत्या.ही बाब युवा फोरम भारतचे संस्थापक ॲड.यशवर्धन राणे यांना समजताच ते तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धावून गेले.
गेल्या काही वर्षांत यशवर्धन राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युवा फोरम भारतच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत.प्रत्येक सामाजिक कार्यात ही संस्था नेहमीच अग्रेसर असते.यापुढे देखील आपले सामाजिक कार्य असेच चालू ठेवणार अशी प्रतिक्रिया ॲड. यशवर्धन राणे यांनी दिली आहे.