सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालया तर्फे बबली राणे यांचा सत्कार

सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालया तर्फे बबली राणे यांचा सत्कार

ओरोस
   जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सिंधुदुर्ग आयोजित रस्ता सुरक्षा अभियान 2025 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाले. सदर अभियानाचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ओरोस येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता सर्वगोड उपस्थित होते. 
    या उद्घाटना प्रसंगी विना अपघात एसटी बस चालक  व रीक्षा व्यावसायिकांचे सत्कार करण्यात आले. तसेच गेली 25 वर्षे अपघातग्रस्तांना मदत करत असल्यामुळे सिंधुदुर्ग आरटीओ ऑफिस तर्फे श्री बबली राणे यांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.