वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्याकडून शुभेच्छा
वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच वेंगुर्लावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.वेंगुर्ला नगरपरिषद ही कोकणातील ऐतिहासिक आणि लोकाभिमुख संस्था असून शहराच्या विकासात तिचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि नागरिक सुविधांच्या माध्यमातून नगरपरिषदेने सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे.आगामी काळात वेंगुर्ला शहर अधिक आधुनिक, सुंदर आणि नागरिकाभिमुख बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी नमूद केले. "लोकसहभाग आणि प्रशासन यांचा समन्वय साधल्यास वेंगुर्ला शहर विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
konkansamwad 
