वेंगुर्ला येथे उद्या इंडिया आघाडीचे उमेदवार खा.विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा.
वेंगुर्ला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांची जाहीर प्रचार सभा बुधवार दि.१ मे रोजी वेंगुर्ला माणिकचौक येथील सी.आर. खानोलकर व्यासपिठावर सायंकाळी ७ वाजता आयोजित केली आहे. या सभेसाठी खासदार विनायक राऊत, उपनेते लक्ष्मणराव वडलेपाटील, उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक, माजी आमदार शंकर कांबळी, उपनेत्या जान्हवी सावंत, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, विधानसभा संफप्रमुख शैलेश परब, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष विधता सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष योगेश कुबल, उबाठा शिवसेना शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, महिला उपजिल्हा संघटिका श्वेता हुले, महिला शहर संघटिका मंजुषा आरोलकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी नगरसेविका सुमन निकम, विभाग प्रमुख संदिप पेडणेकर, शहर समन्वयक विवेक आरोलकर, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, महिला उपशहर संघटिका कोमल सरमळकर, शाखा प्रमुख अरुणा माडये, अभिनय मांजरेकर, सुनिल वालावलकर, दिलीप राणे, गजानन गोलतकर, हेमंत मलबारी, सुरेश वराडकर, डेलीन डिसोजा यांसह महाविकास आघाडी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना यशवंत परब म्हणाले की, खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा तालुक्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सर्व यंत्रणा व कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. पुढील दिवसात 'मशाल' चिन्ह डेमोच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचवण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची परिस्थिती पाहता अनेक मशनरी बंद पडलेल्या आहेत.
आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशभर प्रत्येक जिल्ह्यात आयुष विभागाअंतर्गत आयुर्वेदिक हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता. मात्र बाजूच्या गोवा राज्यात हे आयुष हॉस्पिटल सूरु होऊन रुग्णांना १० रुपयात सेवा मिळत असताना स्वतःच्या हॉस्पिटलचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवा यासाठी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल आयुषचे हॉस्पिटल अपूर्ण ठेऊन पंतप्रधान मोदींचीच फसवणूक केली आहे. मेडिकल कॉलेजचे ३ डीन बदलण्यात आले. भाजप नेते आरोग्य यंत्रणा स्थिर ठेवण्यात अकार्यक्षम ठरले आहेत.
आजची शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यातील शिक्षणाची परिस्थिती बघता अतिशय दयनीय आहे. शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. जिल्ह्यात बेरोजगारी वाढली आहे. आंबा काजूला हमीभाव मिळत नाही. तसेच सिंधुरत्न योजनेतून दिल्या जाणा-या साहित्यावर कर आकारून शेतक-यांची याबाबतीत फसवणूक होत आहे. मागच्या १० वर्षात जिल्ह्यातील जनतेवर स्वतःचा रुग्णालयाचा व्यवसाय चालवा म्हणून अन्याय केला आहे. या सर्वांना वाचा फोडण्यासाठी ७ मे रोजी होणा-या मतदानातून भाजपला जनतेनेच यांना उत्तर द्यावे. व सर्वसामान्य जनतेच्या मनात खासदार विनायक राऊत यांना प्रचंड मताधिक्य द्यावे असे आवाहन ही यशवंत परब यांनी केले आहे.