मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

  राज्य शासनाने 'मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना' ही महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक  ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती पद्मश्री बैनाडे, संबंधित विभागाचे अधिकारी, बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑईल कार्पोरेशनचे प्रतिनिधी तसेच गॅस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
   जिल्हाधिकारी म्हणाले, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे पात्र लाभार्थी आणि  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब या योजनेस पात्र असणार आहे, एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी योजनेस पात्र ठरणार आहे. तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
   श्रीमती बैनाडे म्हणाल्या शासन निर्णयाप्रमाणे १ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार, १ महिन्यात केवळ १ गॅस सिलेंडर रीफिल करता येणार, हा लाभ केवळ १४.०२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय असेल, १ जुलै २०२४ रेाजीनंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत, लाभार्थ्यांनी गॅस कनेक्शनचे ई-केवायसी करुन घ्यावे तसेच बँक आकाऊंट देखील आधार संलग्न करुन घेण्याचे त्यांनी आवाहन केले.