शिवसेनेच्या वतीने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले वाटप शिबिर

शिवसेनेच्या वतीने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले वाटप शिबिर

कुडाळ

 

     दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे विविध दाखले मोफत मिळावेत, यासाठी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने उद्या 6 मे व 7 मे रोजी मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्थळ वेळ
शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शिबिर महायुती कार्यालय, पोस्ट कार्यालयासमोर येथे होणार आहे. 

कोणते दाखले मिळणार?
या शिबिरात विद्यार्थ्यांना खालील दाखले मोफत दिले जाणार आहेत

उत्पन्नाचा दाखला
वय अधिवास दाखला
जातीचे प्रमाणपत्र
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र 
अल्पभूधारक दाखला
 
   दहावी व बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी हे दाखले अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या दाखल्यांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सोबत घेऊन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी केले आहे.