भोगव्यातील शाळकरी विद्यार्थ्यांची सायबर क्राईम विरोधात पथनाट्यातून जनजागृती

भोगव्यातील शाळकरी  विद्यार्थ्यांची सायबर क्राईम विरोधात पथनाट्यातून जनजागृती


परुळे  

निवती पोलिस स्टेशन यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील मोहक अशा भोगवे किनाऱ्यावर सायबर क्राईम,आमली पदार्थाचे सेवन आणि साठवणूक या विरोधात जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद भोगवे शाळा नंबर 1 च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या सादरीकरणात त्यांनी अतिशय सुंदररित्या सायबर क्राईमचे सरूप व ते थांबवण्यासाठी करता येणाऱ्या कृती प्रात्यक्षित स्वरूपात स्पष्ट केल्या.
      या कार्यक्रमाला भोगवे गावचे उपसरपंच रूपेश मुंडये,ग्रामपंचायत सदस्य उल्का कोळंबकर,प्रणाली पाटकर,मिलिंद सामंत,निवती पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक नितीन पाटील,पोलीस अंमलदार शेडगे,पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर, श्वेता चव्हाण, संदेश पवार, उमेश शिंगारे,विठ्ठल राणे,प्रतीक्षा मुंडये, विवेकानंद बनसोडे,शिवराम कोळंबकर, स्वप्निल कर्लेकर,भोगवे शाळा नंबर 1 चे सर्व शिक्षक,भोगवे ग्रामस्थ,आदी उपस्थित होते. सायबर क्राईम, आर्थिक फसवणूक यासारख्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यात जनजागृती करण्यासाठी सायबर सुरक्षित भारत अभियान राबविण्यात येत आहे. यासारखी कोणतीही अडचण जाणवल्यास या नंबर वर संपर्क करावा 1121930  अशी माहिती दिली गेली.