शिरोडा येथील 'कापांना गल्लीत' पाणी साचल्याने नागरिकांचे हाल; अनेक घरांना निर्माण झाला धोका.
वेंगुर्ला.
तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ येथे श्री देवी माऊली मंदिराच्या जवळ असलेल्या कापांना गल्लीत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.शिरोडा येथे होत असलेल्या नवीन बांधकामामुळे शेकडो वर्ष जुनी पारंपरिक पावसाळी पाण्याची वाट बुजली असून त्याठिकाणी सुमारे तीन फुटांपर्यंत पाणी साचून अनेकांच्या घरात पाणी गेले आहे.या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची घरे मातीची असल्याने सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या जुन्या मातीच्या घरांना धोका निर्माण झाला असून अशा प्रकारचा पाऊस पडत राहिल्यास अनेक नागरिक बेघर होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.गेले तीन दिवस याठिकाणी पाणी साचले असून अद्यापही शिरोडा ग्रामपंचायती कडून कोणतीही दाखल न घेतल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.